आदित्य ठाकरे हे बर्याच युवा व तरुण पिढीसाठी युवा चिन्ह म्हणून विकसित झाले आहेत. युवसेना प्रमुख ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यांचा जन्म १३ जून १९९० रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांने शालेय शिक्षण मुंबई येथील बॉम्बे स्कॉटीश स्कूल माहीममधून केले होते. सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथून बी.ए. इतिहासामध्ये पदवी मिळवली. के. सी लॉ कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एलएलबी पदवी मिळवली.
आपण सर्व त्यांच्या पॉलिटिकल कॅरिअरशी परिचित आहात. आदित्य ठाकरे यांच्या अज्ञात तथ्यांविषयी बोलू या.
२०१० मध्ये रोहिंटन मिस्त्री यांनी लिहिलेल्या "सच अ लाॅग जर्नी" या कादंबरीविरोधात ते आंदोलनात सहभागी झाले होते. हे त्यांचे पहिले आंदोलन होते.
फार थोड्या लोकांना माहिती आहे की आदित्य ठाकरे एक चांगले कवी देखील आहेत. २००७ मध्ये त्यांनी स्वताचे पहिले कविता पुस्तक "माय थाॅट्स वाइट ब्लॅक " या नावाने लिहिले. त्यांच्या काही कविता मुंबई मिरर वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या आहेत.
नंतर त्यांनी गाण्याचे बोल लिहिण्यास सुरवात केली आणि गीतकार झाले. त्यांनी आपला खासगी अल्बम "उम्मीद" नावाने जारी केला. या अल्बमसाठी त्यांनी आठ गाणी लिहिली होती. आपल्याला यूट्यूबवर अल्बममधून दोन गाणी सापडतील. आदित्य ठाकरे आभिनीत "हलके हकले" आणि मिलिंद गुणाजी अभिनीत "एक खोज" ही गाणी सापडतील. एम प्लॅनेटने लाँच केलेला "एक खोज" चे काही व्हिडिओ युट्यूबवर आहेत.
या साहित्य प्रेमीला नमन.
- मनिष ह. म्हात्रे
ENGLISH TRANSLATION
Aaditya Thackeray has evovled as a youth icon for many youths and young generation. His journey from Yuvasena President to Cabinet Minister of Maharashtra is remarkable. He is the grandson of Hinduhridaysamrat Balsaheb Thackrey. He was born on 13 June, 1990 in Mumbai. He had done his schooling from Bombay Scotish School Mahim, Mumbai. He has done graduation in B.A History from St. Xaviers College, Mumbai. Post graduation from K. C Law College, Mumbai and secured LLB degree.
You all are familiar with his Politicial Carreer. Lets talk about Aaditya Thackeray's unknown facts.
He was involved in agitation against the novel "Such a long journey" written by Rohinton Mistry in 2010. This was his first agitation.
Very few people know that Aaditya Thackeray is a good poet as well. He wrote his first poem book by name "My thoughts White and black" in 2007. Some of his poems are published in Mumbai Mirror newspaper.
Later he started writing lyrics of songs and became lyricist. He released his private album by name "Umeed" . He had wrote eight songs for this album. You can find two songs from the album on youtube. "Halke Hakle" song staring Aaditya Thackeray and "Ek Khoj" song staring Milind Gunaji on youtube. Few videos of "Ek Khoj" launched by M Planet are there on youtube.
Hatsoff to this literature lover.
- Manish H. Mhatre
Some youtube links of Aaditya Thackeray are below, Please watch.
No comments:
Post a Comment